माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा द्या; दोषींची मागणी

0

पुण्यातील बहुचर्चित नयना पुजारी खूनप्रकरणातील न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, आज शिक्षा सुनावण्यापूर्वी दोषींना न्यायालयासमोर स्वत:ची बाजू मांडण्याची अखेरची संधी देण्यात आली. यावेळी योगेश राऊत याने आपण हा गुन्हा केला नसल्याचा दावा केला.

न्यायालयात आणताना आणि नेताना पोलिसांकडून आपल्यावर दबाव आणला जातो. मला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे, असे त्याने म्हटले. तसेच राजेश चौधरी हादेखील गुन्ह्यात सहभागी होता. त्यामुळे त्यालाही शिक्षा करण्यात यावी, असे राऊतने म्हटले. मात्र, न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावली.

माझ्या आईचा, लहान मुलीचा आणि पत्नीचा विचार करून शिक्षा कमी करावी, अशी विनंतीही योगेश राऊत याने केली. तर महेश ठाकूर याने न्यायालयासमोर काहीही बोलण्यास नकार दिला.

या प्रकरणातील तिसरा दोषी विश्वास कदम यानेही न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने हा गुन्हा केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली.

LEAVE A REPLY

*