मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार, भारतीय हवामान विभागाची माहिती

0

मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

14 मे रोजीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला.

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने 18 एप्रिल रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला होता.

अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

*