Type to search

जळगाव

माधवनगरातील वीज डीपी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Share

जळगाव । शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपतीनगर, माधवनगर, सोनी नगर, सुखअमृतनगर परिसरात वीज मीटरच्या प्रतीक्षेत असून आठवड्याभरात वीज डीपी बसविले जाणार असून अनेक दिवसापासून अंधारात असलेल्या या भागाची दिवाळीही लवकरच लाईटांच्या रुपात चकाकणार आहे.

गणपती नगरात वीज डीपी आहे मात्र मीटर नव्हते. आता मिटर बसवले गेले. वीज डीपीही आहे. लवकरच कनेक्शन जोडले जाणार असून केव्हा मीटरचे उद्घाटन होते या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.  नागरिकांनी याबाबत मनपाकडे लाईट बसविण्याबाबत निवेदनही दिले होते. तसेच इतर नगरातही अंधार होता.या भागात वीज मीटर बसवले गेले नव्हते त्यामुळे या सर्व भागात अंधाराचे साम्राज्य होते. किरकोळ रकमेसाठी या परिसरात डिमांड नोट भरण्यात आली नव्हती. उशीरा का होईना ही डिमांड नोट भरण्यात आली. वीज मीटर बसवण्याचे काम सुरू होते. वीज मीटर बसवण्याचे काम आता आटोपले असून  या चारही भागात व पिंप्राळा परिसरात लवकरच वीजमीटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

परिसरातील अंधार दूर होणार

अनेक वर्षापासून पिंप्राळा परिसरातील गणपतीनगर, माधवनगर, सोनी नगर, सुखअमृतनगर परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. या परिसरासाठी डिमांड नोटच अद्याप भरले गेली नव्हती. हे काम मनपाचे होते मात्र मनपा -एमएसईबी यांच्यात या मुद्दावर चालढकल करण्यात येत होती. या परिसातील नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा केला होता. अखेर गेल्या काही दिवसापासून घरोघरी वीज मीटर बसविण्यात येत होते. आता जोडणीचे सर्व काम अंतिम टप्प्यात असून आज लाईट या परिसरात चकाकण्यास सुरूवात होणार असून वीज मीटर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.वीज लाईट चकाकणार असल्याने परिसरात एक समाधानाचे वातावरण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!