‘मातोश्री’चा आदेश नाही; गाडेंकडून वृत्ताचे खंडण

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– शहरातील महामार्ग महापालिकेकडे वर्ग करून घेण्या संदर्भात मातोश्रीवरून कोणतेच आदेश/निरोप आलेले नाहीत असे सांगत सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. महामार्ग वर्ग करून घेण्याचा कोणताच प्रस्ताव माझ्यासमोर आलेला नाही. त्यामुळे तो विषयच नाही असे महापौर सुरेखा कदम यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
गुरूवारच्या अंकात ‘मातोश्रीने रोखली बारची वाट’ असे वृत्त नगर टाइम्स’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताने सेनेसह शहरात एकच खळबळ उडाली.

मातोश्रीवरील आदेशाची माहिती ‘नगर टाइम्स’पर्यंत पोहचलीच कशी? याची चौकशी केली जात होती. काही नगरसेवकांनी खासगीत बोलताना महामार्ग वर्ग करण्याचा विषय समोर येणार नाही असे सांगत वृत्त खरे असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले. म्हणजेच ‘नगर टाइम्स’चे वृत्त खरे असल्याचे त्यांना मान्य होते, पण ते स्पष्टपणे बोलू शकले नाहीत.

LEAVE A REPLY

*