Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

मातृभाषेतील शिक्षणातच प्रगतीचा मार्ग

Share

आपण आपल्या पाल्यासाठी शाळा निवडताय, माध्यम निवडताय, थोड थांबा. विचार करा. मग माध्यम निवडा. मुलं जन्माला येण्याअगोदरपासून मातृभाषा शिकवण्यास सुरूवात करते आणि समजू लागते. जन्माला आल्यानंतरही परिसरात त्यांच्या कानावर तेच शब्द येतात व त्याला त्यांची सवय होते किंवा असते. परंतु आपण आज त्या मुलाच्या भाषेची पुर्ण वाट लावत आहे. प्रत्येक भाषा ही सुंदरच आहे.

परंतु आपणास आज असे वाटते की फक्त इंग्रजी भाषाच छान आहे. बाकी काही नाही आले तरी चालेल अशी धारणा आपली झालेली आहे. सर्व शिक्षण तज्ञ सांगतात, की मातृभाषेतील शिक्षणच सर्वोत्तम शिक्षण आहे. कमीत कमी आपण मुलांचे पुर्व व प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवे. महाराष्ट्र राज्य सोडले तर इतर राज्यात मुलांना त्यांच्या प्रादेशिक भाषेतच शिकविले जाते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. जपान, फिनलँड या देशात त्यांची स्वत:चीच भाषा शिकवतात म्हणून जपान सारखा देश आज कमी लोकसंख्या असतांना ही विकसीत देशाच्या यादीत आहे. पुणे जिल्ह्यात आता लोकांना कळून चुकले आहे की मुलांना मातृभाषेत शिकविले पाहिजे म्हणून तेथील पालकही आता मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. त्यांच्यात बदल झाले मग आपण कधी हा विचार करणार. त्यामुळे आपले आर्थिक गणितही सांभाळले जाईल. सोनम वागचुक म्हणतात मुलाला जर मातृभाषा येत असेल तर इतर भाषा शिकवण्यासाठी त्याला फक्त दोनच आठवडे लागतात.

आज आपल्या मुलांचे आपण व्यवस्थित मुल्यमापन करू शकत नाही. परकीय भाषेतील गोष्टीतील मुख्य मजकूरच समजत नाही. व त्याची मांडणी त्याला आपल्या भाषेत येत नाही. पर्यायाने मुल अभ्यासापासून लांब पळतात. भाषा पुर्णपणे अवगत न झाल्यामुळे मुलांचे (ीज्ञळश्रश्र) कौशल्य विकास होत नाही. नुसते पुस्तकी ज्ञान गोळा करणे म्हणजे शिक्षण नव्हे? आज मुलांना स्वत:चे मत मांडता येत नाही.

स्वत:च्या मातृभाषेत स्वत:चे विचार नेमकेपणाने मांडता येणे हा करिअरचा एक महत्वाचा टप्पा आहे. यावर जगातील सर्वच भाषा तज्ञांचे एकमत आहे. आज उत्तम नोकर्‍या मिळणे दुरापास्त झालेले नसून कौशल्यविरहित शिक्षण घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुलाखतीला जातांना उमेदवार ज्या ठिकाणी ज्या विषयासाठी मुलाखत देणार आहे. त्याबद्दल त्याला 5 मि.सलग बोलता येत नाही म्हणून सगळीकडे बेरोजगारी वाढली आहे. स्वत:च्या क्षेत्राची कौशल्य मिळवू शकत नाही. पालक म्हणून आपला समज एक गैर समज असतो, तो म्हणजे मुलाने अ इ उ ऊ लहरीीीं वरची नाव दोन तीन इंग्रजी कविता म्हटल्या की आपण त्याला इंग्रजी माध्यमात टाकण्याचा विचार करतो. एका ठराविक लिमीटपर्यंत आपल्याला सर्व सोप वाटत नंतर पूर्णपणे आपण व आपले मुलं दुसर्‍यावर अवलंबून राहते. आपल्याला खरी प्रगती समजत नाही. आणि जेव्हा समजते तेव्हा अशी स्थिती असते की, आपण मागेही जाऊ शकत नाही व पुढे मुले जाऊ शकत नाही. दोघांनाही र्ऋीीीीींरींळेपी तणाव येतो व नको ते घडते. आपला आग्रह आपल्यालाच त्रास देतो.

अजून पालकांकडून नेहमीच एकायला येणारे वाक्य ते म्हणजे आम्ही नाही शिकलो इंग्रजी माध्यमात मग आमची मुलं नकोत मागे रहायला थोडा तुलनात्मक अभ्यास केला तर सर्वांच्या लक्षात येईल की मराठी, माध्यमातून शिकलेल्यांना मराठीतर येतेच परंतु त्यांचे इंग्रजीही छान असते. बोलता येते, एवढेच नाही तर निरीक्षणातूनच ऐकून इतर भाषाही अवगत करता येते. याउलट आजच्या विद्यार्थ्यांची अवस्था झालेली आहे. त्यांना कोणतीच भाषा पूर्णपणे अवगत नाही कटू आहे पण सत्य आहे तरीही अजूनही वेळ आपल्या हातात आहे. डोळसपणे निर्णय घ्यावा व भावीपिढी आपल्या हातून छान घडावी ही सदिच्छा !
मो. 9422230772
योगिता शिंपी, जळगाव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!