माझ्या मालिकाही इतर मालिकांसारख्या ‘स्टुपिड’: एकता कपूर

0

निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरने आपल्या टीव्ही मालिकेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

माझ्या टीव्ही मालिका या दुसऱ्या टीव्ही मालिकेप्रमाणेच स्टुपिड असतात. असे बेधडक वक्तव्य एकता कपूरने केले आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं की, ‘माझ्या टीव्ही सीरियल या दुसऱ्या टीव्ही सीरियलसारख्या स्टुपिड आहेत.’

आपल्या सास-बहू मालिकेच्या माध्यमातून टीव्ही जगतात पोहचलेली एकता कपूरनं नुकतंच आपलं स्वत:चं अॅप लाँच केलं आहे. या नव्या अॅपच्या माध्यमातून ती नव्या मालिकांची वेब सीरीज सुरु करत आहे.

या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना एकता म्हणाली की, ‘टीव्ही मालिकेच्या फॉर्मेटमध्ये काम करताना माझ्या डोक्यात वेब माध्यमाचा विचार आला.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एकताने  ‘कर ले तू भी मोहब्बत’ ही वेब सीरीज तिने सुरु केली आहे. या वेब सीरीजमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहेत.

या वेब सीरीजला अनेकांनी पसंतीही दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

*