Type to search

धुळे

माजी मंत्री हेमंत देशमुखांना तीन दिवस कोठडी

Share

धुळे । दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी काल जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची म्हणजेच 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज दि 23 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. डॉ. हेमंत देशमुख यांच्या वकिलांनी सन 2016 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. त्यावर काहीही तपास झालेला नाहीअसा युक्तीवाद केला. तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तंवर यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्यातील डॉ. देशमुख हे मुख्य आरोपी असून घरकुल योजना राबविण्यासाठी जी तीन जणांची हाय पॉवर कमिटी तयार करण्यात आली होती.

त्याचे ते सदस्य होते व दुसरा सदस्य माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यावर योजनेच्या ठेकेदारांच्या खात्यावरून जवळपास 15 कोटींचा व्यवहार झाला असून योजनेत जवळपास 5 कोटी पेक्षा अधिकचा अपहार झाला आहे ते हस्तगत करणे बाकी असून डॉ. हेमंत देशमुख यांना अनेकदा चौकशीसाठी बोलाविले असता त्यांनी तपास कामी मदत केलेली नाही. उलट मला प्रश्नावली तयार करून द्या अशी मागणी करत प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली म्हणून तपास अपूर्ण असून तो पूर्ण करण्यासाठी डॉ. हेमंत देशमुख यांची पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने डॉ. हेमंत देशमुख यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डॉ हेमंत देशमुख यांच्याकडून अ‍ॅड. सोनवणे, सरकारकडून देवेंद्र तंवर तर फिर्यादी कृष्णा नगराळे यांच्यातर्फे नितीन दुसाने यांनी बाजू मांडली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!