Type to search

जळगाव

माजी उपसरपंचासह चौघांना पोलीस कोठडी

Share

पहूर, ता. जामनेर । वार्ताहर – पहूर पेठ येथील बडामोहल्ला परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून अटक केलेल्या पाचही संशयिताना जामनेर न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान संशयिताच्या घरून धारदार तलवार जप्त करण्यात आली. पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांची तडकाफडकी नियंत्रण कक्ष, जळगाव येथे रवानगी करण्यात आली आहे.

रविवारी सायंकाळी पहूर पेठेतीत बडा मोहल्ला येथे स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात माजी उपसरपंच इकरामोद्दीन समसुद्दीन (वय58), शाहिस्तेखान राहिम खान पठाण (वय 46), रसुलखान रहिम खान पठाण (वय 50), इकबाल शेख लतीफ शेख (वय 32), सय्यद अमिर सै. गुलाब (वय 52)रा. सर्व पहूर पेठ, बडामोहल्ला यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी घटनास्थळी पोलीसांशी हूज्जत घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या विजय पाटील यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यात त्यांचे शर्ट फाटले. घटनास्थळी जमलेल्या आठ जणांनी आरडाओरडा करून कर्मचार्‍यांना अडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी महीला पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली महाजन यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता संबधीत महीलांनी त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच शासकिय कामात अडथळा आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांची जळगाव येथे नियंत्रण कक्षात तडकाफडकी रवानगी करण्यात आली असून तात्पुरता पदभार पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बागुल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!