Type to search

धुळे

माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या जामिनावर सोमवारी निर्णय शक्य

Share

दोंडाईचा । । येथील दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार प्रकरणात तात्पुरत्या जामिनावर असलेले माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या जामीन अर्जावर दि 22 जुलै रोजी निर्णय होणार असून आज जिल्हा न्यायालयात झालेल्या कामकाजात डॉ. हेमंत देशमुख यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. न्यायधिश उगले हे यावर सोमवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.

दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार प्रकरणात जानेवारी महिन्यापासून माजी नगरसेवक तथा हाय पॉवर कमिटीचे सदस्य असलेले गिरीधारी रामराख्या हे अटकेत आहेत तर इतर आरोपींना तात्पुरता जामीन मिळाला आहे. त्यात तीन माजी नगराध्यक्ष, तीन मुख्याधिकारी, माजी नगरसेवक, ठेकेदार, नाजीम शेख यांचा समावेश आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपास करतांना हाय पॉवर कमिटीचे सदस्य असलेले गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यावर आलेल्या 15 कोटींच्या रकमेचा तपास करण्यासाठी इतर संशयितांची चौकशीची गरज असल्याची बाजू न्यायालयात मांडली असून त्यातील गिरीधारी रामराख्या वगळता सर्वच संशयितांना तात्पुरता जामीन मिळाला असल्याने पोलिसांचा तपास थांबला आहे.

दरम्यान, शासनाकडून जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तंवर, डॉ. हेमंत देशमुख यांच्यातर्फे श्री. सोनवणे, श्री. ओस्तवाल, तर फिर्यादी नगराळे यांच्यातर्फे श्री. दुसाने हे कामकाज पाहत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!