मागील भानगडी विसरुन घरातील वाद घरातच मिटवा!

0
जळगाव । आगामी काळात होणार्‍या निवडणूकांसाठी पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देतील त्याच्यासाठी एकदिलाने काम करा. मागील भानगडी विसरून घरातील वाद घरातच मिटवा असा सल्ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बुथ कमिटी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला.

शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित जळगाव ग्रामीणच्या बुथ कमिट्यांच्या सभेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर,गफ्फार मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल पाटील, दूध संघाचे प्रमोद पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, विजया पाटील, मंगला पाटील, योगेश देसले, कल्पिता पाटील, निला चौधरी,

किसान सेलचे सोपान पाटील, विलास पाटील, धनराज माळी, अ‍ॅड. सचिन पाटील, प्रतिभा शिरसाठ, हेमंत चौधरी, संदीप पाटील, मिनल पाटील, रोहन पाटील, बापू परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना कोते-पाटील म्हणाले की गुलाबराव देवकर हे 50 हजारपेक्षा जास्त फरकाने निवडून येतील अशी वज्रमुठ बांधा. सोशल मीडियाच्या वापरात आपण कमी पडत आहोत. 90 टक्के तरुण सोशल मीडियावर आहेत़ त्यामुळे सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़

शिवसेना-भाजप हीच खरी बोंडअळी
संग्राम कोते- पाटील म्हणाले की, भाषणे ठोकल्याने तरुणांना रोजगार मिळत आहे का?, शेतकर्‍यांना केळीची व बोंडअळीची नुकसान भररपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना भाजप हिच खरी बोंडअळी असल्याची टिका त्यांनी केली. शिवरायांच्या नावाने खोटी कर्जमाफी केली़ स्किल डेव्हलपमेंटच्या नावाने गाजावाजा केला; मात्र, किती तरुणांना रोजगार मिळाला असा प्रश्न कोते-पाटील यांनी उपस्थित केला़

मतदारसंघात 25 टक्केही कामे मंत्र्यांनी केली नाही! – देवकर
सरकारने 25 टक्के शेतकर्‍यांनादेखील नुकसान भरपाई दिलेली नाही़ बागायत शेतकर्‍यांना जीरायतमध्ये टाकुन शेतकर्‍यांचे नुकसान केल. त्याविरोधात आम्ही आवाज उठविला़ जळगाव ग्रामीणमध्ये विद्यमान मंत्र्यांनी आपल्या कामाच्या 25 टक्केदेखील काम चार वर्षात केले नाही अशी टिका माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली.

LEAVE A REPLY

*