Type to search

क्रीडा

मागील काही विश्वचषक स्पर्धेत संघ हरले पण खेळाडू जिंकले!

Share

मुंबई। क्रिकेट विश्वचषक स्पर्धा येत्या 30 मे पासून सुरु होत आहे. सर्व संघांनी विश्चचषक स्पर्धा जिंकण्यासाठी कसून तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकवण्यासाठी कारकिर्दीतला सर्वोच्च खेळ सादर करण्यासाठी सज्ज आहे. या आधीही ङ्गसनथ जयसूर्याफ, ङ्गग्लेन मेग्राफ, ङ्गयुवराज सिंहफ यांसारख्या अनेक खेळाडूंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देण्याचा करिश्मा केला आहे. परंतु दरम्यान असेही काही खेळाडू होऊन गेले ज्यांनी स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली तरीही त्यांच्या हाती निराशाच आली. त्यांना आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देता आले नाही. चला जाणून घेऊया अशा काही खेळाडूंबद्दल ज्यांनी प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मान पटकवला मात्र ते आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात अपयशी ठरले.

मार्टिन क्रो- 1992
न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार मार्टिन क्रो याने 1992च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 9 सामन्यांमध्ये 114 च्या सरासरीने 456 धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने 4 अर्धशतक व 1 शतकही झळकावले होते. या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मार्टिन क्रो याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात स्पर्धेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मान मिळवणारा मार्टिन क्रो हा पहिला खेळाडू होता. संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. अखेर स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करूनही मार्टिन क्रो न्यूझीलंड संघाला विश्वचषक जिंकवून देण्यास अपयशी ठरला.

लान्स क्लूजनर 1999
1999 च्या विश्वचषक स्पर्धेत लान्स क्लूजनरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिका संघातून खेळताना 9 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दरम्यान त्याने 281धावा देखील केल्या होत्या. या स्पर्धेत भारताच्या राहूल द्रवीड सर्वाधिक 461 धावा केल्या तर न्यूझीलंडच्या ज्योफ अलॉट याने सर्वाधिक 20 विकेट्स घेतल्या होत्या. परंतु लान्स क्लूजनरने गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही प्रकारात उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र तरीही त्याला दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषक जिंकवून देण्याचे स्वप्न साकार करता आले नाही.

सचिन तेंडुलकर 2003
मार्टिन क्रो आणि लान्स क्लूजनर यांच्यानंतर असाच काहीसा प्रसंग भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन सचिन तेंडुलकरच्या बाबतीत घडला. 2003च्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने तुफान फटकेबाजी केली. मात्र तरही तो भारताला विश्वचषक जिंकवून देण्यास अपयशी ठरला. या स्पर्धेत सचिनने 11 सामन्यांमध्ये 673 धावा केल्या होत्या. यांत 6 अर्धशतके व 1 शतक होते. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला हरवले होते. सध्या विश्वचषक स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय संघ विश्वचषक 2019चा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!