Type to search

नंदुरबार

मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश

Share

नंदुरबार । शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण नंदुरबार यांच्यामार्फत धर्मराज नगर करण चौफुली परिसर नंदुरबार व मोहिदे त.श. शहादा येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह आणि होळ तर्फे हवेली नंदुरबार येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह सुरू असून या वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश देण्यात येतो.

वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना दोन वेळचे पोटभर जेवण, नास्ता, मोफत वह्या व पुस्तके तसेच शासनामार्फत दरमहा जिल्हास्तरावर 600 व तालुकास्तरावर 500 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येतो.शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. वसतीगृहात प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, वैद्यकीय दाखल्यासह परिपूर्ण भरलेला अर्ज वसतीगृहात जमा करावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!