मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार वाकडीतील शेतकर्‍यांचा निर्णय

0

वाकडी (वार्ताहर)- शेतकरी व मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चा मान्य नसलेल्या शेतकर्‍यांनी संपाला पाठिंबा देत सर्व मागण्या मान्य होईपर्यत हा संप चालूच राहणार असल्याची राहाता तालुक्यातील वाकडी येथील शेतकर्‍यांनी निर्णय झाला आहे.

 
हा संप असाच चालु राहणार आहे. यात सर्व शेतकरी एकत्र असुन यात कोणी फूट पाडु नये. संपाच्या तिसर्‍या दिवशी ही शेतकर्‍यांनी संपात सहभाग नोंदवला. तिसर्‍या दिवशी वाकडी शिवाजी चौकात गावातील शेतकर्‍यांनी गावाचे तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या खंडोबा महाराजांचा जागरण गोंधाळाचा कार्यक्रम करत संपात सरकारचा निषेध केला आहे. वाकडीतील शेतकर्‍यांनी संपात सहभाग नोंदवत आपला भाजीपाला व दुध आजही बाजारात आणले नाही. तसेच गणेशनगर येथील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता.

 

 

तसेच वाकडीचा रविवारचा आठवडे बाजार ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंधळ्या सरकारला शेतकर्‍यांचे हाल दिसेना. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुलदैवताच्या नामाचा जागर करत ‘आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही शेतकर्‍यांचे कैवारी’ त्याचबरोबर भंडाराची उधळणही करण्यात आली व या सरकारचा निषेध केला आहे. गणेशनगर येथील बाजार बंद ठेवला होता. तसेच शेतकर्‍यांनी काहीही अफवानां बळी न पडता आपल्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यत हा संप असाच चालु असणार आहे.

 

 

दुध संकलन केंद्र बंद राहणार आहे असे दुध संकलन केंद्र चालकांनी यावेळी सांगितले. जागरण गोंधाळाच्या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, शंकरराव लहारे, अशोक लबडे, भाऊसाहेब येलम, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश लहारे, मुरलीधर शेळके, अनील कोते, दत्तात्रय येलम, प्रभाकर येलम, विश्‍वनाथ काळे,मच्छिंद्र येलम, मधुकर भवार, रावसाहेब शेळके, महेश लहारे, सुभाष कापसे, भाऊसाहेब कोते, बाळासाहेब शिरगिरे, विष्णूपंत लहारे, संजय जाधव, भाऊसाहेब कापसे, भास्कर आहेर, संजय बनकर आदींसह वाकडीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*