‘माकप’च्या दोन्ही सदस्यांची पक्षातून हकालपट्टी ; जि.प.अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने केले होते मतदान

0

नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकीत माकपच्या (मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्ष) अनिता गोरख बोडके आणि ज्योती जाधव यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली तर उपाध्यक्षपदी नयना गावित यांची वर्णी लागली होती.

जिल्हा परिषद अध्यक्षपद उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी माकपने तटस्थ राहावे असा पक्षादेश असतांनादेखील माकपच्या दोन सदस्यांनी सेना आणि कॉंग्रेसच्या बाजूने मतदान करत ऐनवेळी बाजी पालटली होती. माकपच्या तीन सदस्यांपैकी एक सदस्य कालच्या निवडणुकीत तटस्थ राहीलादेखील होता. पण इतर दोन्ही सदस्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेसला मतदान केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना आणि कॉंग्रेसलाच्या बाजूने मतदान केले तर माकपचे  जिल्हा परिषदेत दोन्ही सभापती केले जातील असे बोलले जात होते. त्यामुळे राष्ट्रीय पक्षावर टीका होऊ लागली म्हणून माकपचे जिल्हा सेक्रेटरी सुनील मालसुरे यांनी या सदस्यांवर शीघ्र कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केल्याचे परिपत्रक धाडले आहे.

LEAVE A REPLY

*