मांजरी ग्रामसभेत वाळू लिलावाला विरोध

0

मांजरी (वार्ताहर)- येथील वाळूसंदर्भात बोलविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव मंजूर करत वाळू लिलावास तीव्र विरोध दर्शविला.

 
मांजरी येथे नदीपात्रात वाळू साठे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासनाच्या महसूल खात्याची कायमच वक्रदृष्टी राहिली आहे. ग्रामस्थांनी कायमस्वरूपी विरोध दर्शविला असूनही तोकड्या महसूलापोटी ग्रामस्थांच्या हरकती घेण्याच्या नावाखाली लिलाव प्रक्रियेमध्ये मांजरीचे नाव येत असते. परंतु ग्रामस्थांनी ही प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करावी, तसेच मांजरी येथून वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही, अशी भूमिका घेत हरकती घेण्यासाठी आलेल्या तलाठी, मंडलाधिकारी यांना वाळूसंदर्भात विरोध दर्शविला. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी मंडलाधिकारी पाखरे होते.

 

यावेळी सोपानराव बाचकर यांनी सांगीतले, वाळूमुळे आमचा परिसर सुजलाम सुफलाम असून पाण्याची पातळी टिकून आहे.वाळूचा लिलाव झाल्यास येथे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शासनाने मांजरी येथील वाळूच्या लिलाव प्रक्रिया रद्द कराव्यात व हरकतीसुद्धा घेण्यास संबंधित अधिकार्‍यांना पाठवू नये. यावेळी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्‍वर कहार, लक्ष्मण चोपडे, काशिनाथ विटनोर, अण्णासाहेब विटनोर, सरपंच कमल माळी, गोरख विटनोर, गंगाहारी विटनोर, कोंडीराम विटनोर, राजेंद्र बिडगर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*