धरणगावच्या महात्मा फुले हायस्कूलचा मुख्याध्यापक निलंबित

0

धरणगाव |  प्रतिनिधी :  येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.ए.अहिरे हे एका महिले सोबत आक्षेपार्हवर्तन करतांना आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, हा वाद पोलीस स्थानकात गेला. ही चर्चा वार्‍यासारखी गावात पसरली. शाळेच्या व्यवस्थापनाने याप्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याध्यापक अहिरे यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले.

शहरातील महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.ए.अहिरे हे दुपारी ३.३० वाजता शाळेतील आपल्या दालनात एका महिले सोबत आपक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. याप्रकाराने खळबळ निर्माण झाली. पोलिसांना दुरध्वनीवरून माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक अहिरे आणि ‘त्या’ महिलेला पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

पोलीस निरीक्षक डी.एस.पाटिल यांनी दोघांचे जबाब घेतले. कुणाचीही तक्रार नसल्याने त्यांना घरी जावू देण्यात आल्याची माहिती ठाणेअंमलदारांनी दिली. दरम्यान, यासर्व प्रकारामुळे शाळेची मानहानी झाली असून मुख्यध्यापक अहिरे यांना श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, सचिव सुकलाल महाजन, चेअरमन ऍड.शरद माळी, संचालक सुरेश महाजन, मधुकर रोकडे यांनी तत्काळ निलबित करण्याचा निर्णय घेवून तसेे लेखीपत्र देवून संस्थेनेही कार्यवाही केली आहे.

संस्थेच्यावतीने धरणगाव महात्मा फुले हायस्कूलचे चेअरमन ऍड. शरद माळी यांनी फिर्याद दाखल करावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, सचिव सुकलाल महाजन, सुरेश महाजन प्राथमिक विभागाचे चेअरमन मधुकर रोकडे व संचालक मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*