महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

0

 संक्रापूरमधील 15 जणांविरूद्ध गुन्हा 

राहुरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील संक्रापूर येथे शेतीच्या वादातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत आरिफा रज्जाक शेख या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला. तसेच इतर तीन महिलांना देखील मारहाण करण्यात आली. संक्रापूर गावाच्या परिसरातील लांडेवाडी भागात शुक्रवारी दि. 5 मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी 15 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता का देत नाही? या कारणावरून जानमहंमद आरिफ शेख, अन्सार रज्जाक शेख, रेश्मा अन्सार शेख, समीर जानअहमद शेेख, जमीर जानअहमद शेख, नजमा जानअहमद शेख, गफूर दावल शेख, सुभेदार दावल शेख, अजित कादर शेख, शायदा दावल शेख, दावल रहिम शेख, सलमान रफिक शेख, तबसूम रफिक शेख, रफिक अमीर शेख, अब्दूल शेख (रा. वाळकी ता. राहाता), शौकत अब्दूल शेख (रा. संगमनेर) या 15 जणांनी फिर्यादी आरिफा रज्जाक शेख, पारूलबी महेबूब शेख यासह आई व आजीला लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले.

 

दरम्यान आरिफा रज्जाक शेख यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने जमावाने रॉकेल अंगावर टाकून पेटवून दिले. असा असा जबाब आरिफा शेख यांनी जबाब पोलिसांना दिला. तायमुळे पोलिसांनी वरील 15 जणांविरूद्ध भादंवि कलम 307, 452, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 नुसार गुरनं. 150 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिलांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ही घटना समजताच डीवायएसपी श्री. पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक फौजदार श्री. घोडे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*