Type to search

जळगाव

महिलेच्या पर्समधून रोख 86 हजार लंपास

Share

चोपडा । शेतीकामासाठी पैसे लागणार असल्याने गणपूर ता.चोपडा येथील रहिवासी असलेल्या रत्नाबाई कैलास पाटील (वय-35) यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने पीपल्स बँकेत गहाण ठेवून 86,000/-रुपये कर्ज घेऊन रक्कम पर्स मध्ये ठेऊन घरी जाण्यासाठी बसस्थानकावर येऊन गणपूर बसमध्ये चढत असतांना चोरट्याने पर्स मध्ये पाकिटात ठेवलेले रोख 86,000/- रुपये काढून पोबारा केल्याची घटना आज सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

कांद्याचे रोप व शेतीकामासाठी पैसे लागणार असल्याने गणपूर येथील रहिवासी असलेल्या रत्नाबाई कैलास पाटील (वय-35) या आई प्रभावती जयदेव पाटील यांना सोबत घेऊन आज दि.19 रोजी सकाळी 11 वाजेला चोपडा येथे येऊन पीपल्स बँकेच्या शाखेत स्वतःच्या सोन्याचे दागिने गहाण ठेऊन त्यावर 86000/-रुपये कर्ज घेतले. क्कम पर्स मध्ये लाल रंगांच्या पाकिटात ठेऊन बाजार करून गणपूर जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या.

यावेळी गणपूर बस मध्ये चढत असतांना रत्नाबाई पाटील यांच्या उजव्या हातात असलेल्या पर्सची चैन उघडून त्यात पैसे ठेवलेले लाल रंगाचे पाकीट चोरट्याने गर्दीचा फायदा घेत काढून लंपास केले.रत्नाबाई पाटील बसमध्ये बसून तिकिटासाठी पर्समधून पैसे काढत असतांना त्यांना पर्सची चैन अर्धवट उघडी दिसली तेंव्हा त्यांनी पैश्यांची खात्री केली असता पैश्यांचे पाकीट आढळून आले नाही. गर्दीचा फायदा घेत पैसे चोरट्याने काढल्याचे निदर्शनास आले.

याबाबत रत्नाबाई कैलास पाटील (वय-35) रा.गणपूर ता.चोपडा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!