Type to search

धुळे

महिलेची सात तोळ्यांची सोनपोत लांबविली

Share

धुळे | शहरातील देवपूर परिसरातील हजारे कॉलनीत अंगणात उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून पत्ता विचारण्याचा बहाणा करून सात तोळे सोन्याची मंगलपोत एक लाख ७५ हजार रूपये किंमतीची सोनपोत धुमटोळीने हिसकावून नेली.

याबाबत पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीत राहणार्‍या सुनंदाबाई शांताराम दुसाने या हजारे कॉलनीजवळ अंगणात उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील व्यक्तीने पत्ता विचारण्याचा बहाणा करून सुनंदाबाई यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत एक लाख ७५ हजार रूपये किंमतीची चोरट्यांनी हिसकावून घेतली. सदर महिलेने आरडाओरड केली. परंतू रस्त्यावर कोणीही नसल्याने चोरटे मोटार सायकलीवरून पळुन गेले. याबाबत पश्‍चिम देवपूर पोलिसात सुनंदाबाई दुसाणे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!