महिला सहकाऱ्याला वाचवताना आयएएस अधिकाऱ्याचा बुडून मृत्यू!

0

दिल्लीच्या दक्षिण भागात परराष्ट्र सेवा संस्थेच्या स्विमिंग पूलमध्ये आपली सहकारी मैत्रिण बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी घेतलेल्या आयएएस अधिकाऱ्याने आपला जीव गमावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीला वाचवण्यासाठी स्विमिंग पूलच्या खोल भागात उडी घेतलेल्या आयएएस अधिकाऱ्याला तात्काळ फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पण उपचाराअंती त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

सध्या घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे.

आशिष दाहिया(३०) असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.

 

LEAVE A REPLY

*