महिला फुटबॉल- भारताने हाँगकाँगला 6-1 ने मात दिली

0
नवी दिल्ली । लिंडा कोमच्या हॅट्रीकमुळे भारताची अंडर-16 महिला फुटबॉल संघाने मंगोलियाचे उलान बतोरमध्ये जारी एएफसी अंडर-16 वुमेंस क्वालीफायरचे आपल्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगला 6-1 ने मात दिली.

लिंडाच्या व्यतिरिक्त शिल्की देवीने दोन आणि सुनिता मुंडाने एक गोल केला.अखिल भारतीय फुटबॉल महासंघा (एआयएफएफ) नुसार, भूटानमध्ये मागील महिन्यात सैफ अंडर-15 चे विजेतेपद जिंकल्यानंतर या खेळांडुचे ध्येय एएफसी वुमेंस चॅम्पियनशिपचे अंतिम टप्प्यासाठी क्वालीफाय करायचे आहे.भारताने सामन्याच्या सुरूवातीपासून दमदार प्रदर्शन केले आणि 23वे मिनीटात सुनिताने गोल करून भारताला तेजी मिळून दिली.

35वे मिनीटात शिल्कीने दुसरा गोल केला आणि यानंतर लिंडाने गोल करून स्कोर 3-0 केला.यानंतर शिल्की (50वे मिनट) आणि लिंडा (73वे आणि 86वे मिनट) ने आणखी तीन गोल करताना भारताचा विजय निश्चित केला.भारताचे मुख्य प्रशिक्षक फिर्मिन डी सूजा यांनी सांगितले की मुलींनी योजनांना अंमलात आणण्यात कोणतीही चुक केली नाही. या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की पाकिस्तानविरूद्ध आम्ही आपली विजय मोहिम सुरू ठेऊ.

भारताचा पुढील सामना 16 सप्टेंबरला पाकिस्तानचे अंडर-16 संघाशी होईल. यानंतर भारतीय संघ यजमान मंगोलिया आणि लाओसशी सामना करेल. आपल्या ग्रुपमध्ये मुख्य स्थानी राहणारे संघ पुढच्यावर्षी
होणारे एएफसी चॅम्पियनशिपच्या अंतिम टप्प्यासाठी क्वालीफाय करेल.

LEAVE A REPLY

*