महिलादिनी १३५ विद्यार्थीनींची मतदार नोंदणी;वडनेरभैरव महाविद्यालयाचा उपक्रम

0

वडनेरभैरव|वार्ताहर:-वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे महिला दिनाचे औचित्य साधून वडनेर भैरव महाविद्यालयात मतदानाचा पवित्र हक्क महिलांना मिळावा यासाठी प्राचार्य अमोल भगत यांनी अभिनव उपक्रम राबवून सुमारे १३५ विद्यार्थिनीची तहसीलदार शरद मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक विभाग व महाविद्यालय यांच्या वतीने मतदार नोंदणी करण्यात आली.

भारतीय भूमीमध्ये प्राचीन काळातील झाशीची राणी लक्ष्मीबाई ते आधुनिक काळातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा अनेक कर्तुत्ववान महिला आहे, आजची महिला कमजोर नसून तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मतदार यादीत नाव असेल तर राजकीय व्यवस्थेत येवून समाज उद्धाराचे कार्य महिलांकडून घडेल असा विश्वास तहसीलदार शरद मंडलिक यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप धारराव होते. यावेळी मंडल अधिकारी विजय भंडारे, तलाठी भीम नरोटे, प्रा. एन. डी. वडघुले, प्रा. एस. डी. फुगट, प्रा. एस. एस. कावळे, प्रा. एम. आर. धेबडे, प्रा. डी. एच. भगुरे, प्रा. संदीप लोखंडे, प्रा. एम. एम. भोसले, प्रा. एस. पी. जगताप, प्रा. सारिका दौंड, प्रा. आर. पी. कुशारे, एस. बी. शिंदे, एस. के. शिंदे आदी उपस्थित होते.

भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये विविध स्तरातील निर्णय प्रक्रियेत आजही महिलांचा पाहिजे तितका समावेश केला जात नाही त्यांचा जेव्हा निर्णय प्रक्रियेत समावेश होईल तेव्हाच खर्‍या अर्थाने महिला दिनाला अर्थ प्राप्त होईल. हाच दृष्टीकोन ठेवून महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
-अमोल भगत, प्राचार्य

LEAVE A REPLY

*