महिलादिनी महिलेकडून लाच घेतांना महिला अधिकारी अटकेत कंडारी येथील घटना

0

 

 भुसावळ – एकीकडे अवघे जग जागतिक महिलादिनानिमित्त सर्वत्र हर्षोल्लास साजरा करीत असताना एका गरीब गरजू महिलेकडून घरकुल पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी अवघ्या हजार रुपयांची लाच स्वीकारतांना एकाच जबाबदार महिला अधिकार्‍यालाच लाच घेताना अटक करण्यात आल्याची दुर्दैवी घटना आज तालुक्यात घडली.
याप्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून विशेषतः महिला वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहे.अटक करण्यात आलेल्या  भुसावळ पंचायत समितीच्या गृह निर्माण अभियंता भाग्यश्री शिंदे असे नाव आहे .
 आज ८ मार्च जागतिक महिलादिनी तालुक्यातील कंडारी येथील वीट भट्टीवर काम करणार्‍या एका गरीब महिलेचे घरकुल पुर्ण झाले असतांना या संदर्भात (कंप्लीशन सर्टीफिकेट) देण्यासाठी भुसावळ पंचायत समितीच्या गृह निर्माण अभियंता महिला भाग्यश्री शिंदे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यावरून आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सापळा रचला.  त्यानुसार आज जागतिक  महिला दिनी भुसावळ पंचायत समिती येथे एक हजार रुपयाची लाच घेतांना ऍन्टी करप्शन ब्युरोचे डिवायएसपी पराग सोनवणे यांच्यासह पथकाने रंगेहात पकडले.
घा घटनेने अधिकारी वर्गात एकच खळबळ माजली आहे.महिलांच्या सन्मानालाकालीमा फासणारी घटना घडल्याने संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे

LEAVE A REPLY

*