Live Video : चला रंगवूया नाशिक उपक्रमाला सुरूवात

0

चला रंगवूया नाशिक उपक्रमाला केटीएचएम महाविद्यालयाच्या भिंतीजवळ सुरुवात झाली असून काही चित्रकारांनी चित्र रंगविण्याला प्रारंभ केला आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, सामाजिक कार्यकर्त्या मिसेस इंटरनॅशनल नमिता कोहक, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ  झाला.

WhatsApp Image 2017-03-09 at 09.38.23

महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर ‘चला रंगवूया नाशिक’ या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करून महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश ‘देशदूत’तर्फे दिला जाणार आहे. नाशिक मविप्र समाज संस्था, सिका इंडिया प्रा. लि., गुंज फाऊंडेशन या संस्था या उपक्रमाच्या सहआयोजक आहेत.

महिला समानता, स्त्री-मुली वाचवा, मुली शिकवा, स्त्री सबलीकरण, स्त्री सुरक्षितता,  मुलींची विकास भरारी, नाशिक हेरिटेज/परंपरा, स्मार्ट नाशिक या विषयांवर सहभागी स्पर्धकांना भित्तीचित्र काढायचे आहे.

chala rangauyaa nashik logoक्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन, सीए असोसिएशन, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, स्ट्रायकर्स संस्था, नाशिक रन, हँड फाऊंडेशन, हौसला  फाऊंडेशन, नॅब, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, मविप्र शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांच्यासह नाशिकमधील चित्रकार, कलावंत, विद्यार्थी, विविध संस्था आणि संघटना, व्यावसायिक, उद्योजक असे सर्व स्तरातील लोक सहभागी होणार आहेत. लहान मुलांचा भिंत रंगवण्याकडे असलेला विशेष ओढा लक्षात घेता त्यांच्यासाठी रंगवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत यशस्वी होणार्‍यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*