महिलांचे लैंगिग छळापासून संरक्षणावर कार्यशाळा

0

चाळीसगाव , |  प्रतिनिधी :  शहरातील बी.पी.आर्टस, एस.एम.एस.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात सोमवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोेग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, व के.की.सी.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ च्या अमंलबजावणी बाबत एक दिवसीय कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाली.

अध्यक्षस्थानी मा.आ.साहेबराव घोडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, ऍड.संतोष पाटील, प्राचार्य डॉ.पी.एस.बावीस्कर, प्रा.एम.व्ही.बिल्दीकर, उपप्रचार्य प्रा.एस.ए.मुठाणे, उपप्रचार्य प्रा.अजय काटे, उपप्रचार्य प्रा.भिंगारे, कार्यालीन अधिक्षक हिलाल पवार, प्राध्यापिका पी.बी.सोनवणे आदि उपस्थित होते.

ज्या ज्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त व्यक्ती कामास आहेत तेथे अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. महिलांना जर आपली सहकारी म्हणून वागणूक दिली व सन्मान दिला तर आशा सिमीतीची गरज पडणार नसल्याचेे यावेळी मनोगत व्यक्त करताना देवायणी ठाकरे यांनी सांगीतले. तसेच ऍड संतोष पाटील, मा.आ.प्रा.साहेबराव घोडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य, उपप्रचार्य, अतर्ंगत महिला तक्रार निवारण समितीचे चेअरमन पी.बी.सोनवणे, सदस्य प्रा.तिलोतमा चौधरी, ग्रंथपाल अर्चना वनीकर, मनोहर निकम, भूषण जोशी, विद्यार्थींनी सुप्रिया महाले, सुवर्णा देवरे, वर्षा शर्मा, तसेच सदस्या डॉ.हेमांगी पूर्णपात्रे आदिनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा.डॉ.किरण गंगापूरकर यांनी केले. तर आभार प्राध्यापिका पी.बी.सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*