महावीरनगर जैन स्थानकात श्री गुरु आनंद जयंती महोत्सव

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत 1008 आचार्य सम्राट गुरुदेव प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त 18 ते 24 जुलै दरम्यान श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, महावीर नगर येथे सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी दिली. अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत 1008 आचार्य सम्राट गुरुदेव प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त 18 ते 24 जुलै दरम्यान श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, महावीर नगर येथे सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी दिली. शासन प्रभाविका साध्वीरत्ना गुरुमाता प.पू. सुशीलकुँवरजी म. सा. की सुाशिष्या मधुर व्याख्यान प.पू. श्री.सुनंदाजी म.सा. अधिठाणातील यांच्या सानिध्यात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एकासन दिन, दुसर्‍या दिवशी जाप दिन, तिसर्‍या दिवशी मौन दिन,चौथ्या दिवशी सामायिका, पाचव्या दिवशी दानदिन, सहाव्या दिवशी दया दिन, सातव्या दिवशी आयंबिल दिन तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी अशोक बलदोटा यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सप्ताहामध्ये दररोज रात्री 8.30 ते 9 यावेळेत आनंद चालीसा होणार आहे.
23 जुलै रोजी प.पु.सुनंदाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवचन व सकाळी 10 ते 4 यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीर होणार आहे. त्याचालाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अनिल कटारिया, सेक्रेटरी अशोक बलदोटा, खजिनदार पोपटलाल कटारिया व पदाधिकार्‍यांनी केले आहे. हे सर्व कार्यक्रम चंदनमलजी सुराणा जैन स्थानक महावीरनगर येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

*