महावितरणच्या ठेकेदारकडून कामगारांची आर्थिक लूट – महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशनतर्फे कारवाईची मागणी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  महावितरणकडून ग्राहकांना सेवा देण्यासाठी ठेके दिले जात आहे. नविन टेंडर काढण्यात आलेल्या ठेकेदाराकडून महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्‍यांकडून आर्थीक लूट केली जात असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशनने कार्यकारी अभियंतांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात महावितरणची ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी व महावितरणची कामे करण्यासाठी टेंडर काढले जात असते. यावर्षीचे टेंडर दि.१ मार्च रोजी नाशिक येथील ऐ.के.मार्केटिंग याकंपनीला देण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून जळगाव तालुक्यातील कर्मचार्‍यांकडून सहा महिन्यांसाठी ९ हजार रुपये तर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कंत्राटी कामगारांकडून दरमहा दीड हजार रुपये मागितले जात आहे.

याबाबत कंत्राटी कर्मचार्‍यांनी ठेकेदार ए.के.मार्केटींग कंपनीच्या अधिकार्‍यांची भेट घेवून विचारणा केली असता. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून आम्हाला अधिक्षक, अभियंता, लेखाधिकारी, कार्यकारी अधिकारी यासह कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागत असल्याचे उत्तर मिळाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच प्रत्येक कंत्राटी कर्मचार्‍याला पैसे द्यावेच लागेल अन्यथा तुम्हाला कामावर काढून टाकण्याची धकमी दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*