महावितरणच्या कारभारावर स्थायीची नाराजी

0

महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांची बैठकीला गैरहजेरी, ट्रान्सफार्म बसवण्यासाठी अधिकार्‍यांकडून होणारी पैशाची मागणी, मंजूरी असतांना ट्रान्सफार्म बसवण्याचे अपूर्ण असलेली कामे, भारनियमात वाढ, वीजेची वारंवारची ये-जा, ठेकेदारांकडून कृषी पंपाची अंदाजे दिली जाणारी बीले, महावितरणच्या अशा अनागोंदी कारभारावरून जिल्हा परिषदेची आजची स्थायी सभा चांगलीच गाजली.

त्याचबरोबर नांदगाव 56 खेडी योजना सरकारकडे वर्ग करणे, शेतकरी कर्जमाफी, ट्रँकर सुरू करण्याचे अधिकार तहसिलदारांना द्यावे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूबियांप्रमाणे शहीदांच्या कुटूबियांनाही आर्थिक मदत करण्यात यावी, शेततळे कागदासाठी शेतकर्‍यांना बिनव्याजी 1 लाख रुपये द्यावे, असे ठरावही सभेत मंजूर करण्यात आले.
निवडणूकीनंतर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा शितल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली रावसाहेब थोरात सभागृहात आज पार पडली. प्रसंगी उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनिषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारस्कर, मुख्य कार्यकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य डॉ. आत्मराम कुंभार्डे, यतिन कदम, बाळासाहेब शिरसागर, शंकरराव धनवटे, भारती पवार, सविता पवार, किरण थोरे उपस्थित होत्या. सभेच्या सुरवातील अवघड क्षेत्रात असलेल्या शाळांचा समावेश सोप्या क्षेत्रात केल्याने उपाध्यक्षा नयना गावित व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी नाराजी व्यक्त केल्याने अध्यक्षांनी यावर अभ्यास करण्याचे अश्वासन दिले.

यानंतर भास्कर गावित यांनी आदिवासी भागातील शेतकर्‍यांचीे धरणापासून ते शेतापर्यंत गाळ वाहून नेण्याची ऐपत नसल्याने आदिवासी भागात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

*