‘महालक्ष्मी’चे संचालक गेले कोण्या गावा?

0

    खातेदारांना पैसे देण्यास टाळाटाळ 

अहमदनगर(प्रतिनिधी) – शहरातील महालक्ष्मी मल्टिस्टे को-ऑप. के्रडिट सोसायटीकडून वर्षापासून अनेक ठेवीदारांना ठेवींची मुदत संपूनही पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप धनंजय ढोरजे यांनी केला आहे.संचालक ठेवीदारांना तोंड दाखविण्यास तयार नाहीत. त्यामुळे संचालक गेले कोण्या गावा असा प्रश्‍न ठेवीदार, खातेदारांना पडला आहे.
शहरातील काही पतसंस्थानी केलेल्या गैरकारभारांमुळे त्या बंद पडल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. के्रडिट सोसायटीत झाला असण्याची चर्चा ठेवीदारांमध्ये आहे. या पतसंस्थेच्या सर्व संचालकांनीही आपली तोंडे लपवली असून ठेवीदारांना भेटण्यास जाणीवपूर्वक टाळटाळा केली जात आहे. महालक्ष्मी मल्टिस्टेअ को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये मोठ्या विश्‍वासने अनेक ठेवीदरांनी मोठ्या रक्कमेच्या ठेवी ठेवल्या आहेत. अनेक ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपूनही त्यांना मागील वर्षापासून तारीख पे तारीख देवून पैसे देण्यात आलेले नसून त्यांची फसवणूक झालेली आहे. सेच अनेक संचालक ठेवी परत करण्यास टाळाटाळ करत आहे. शहरातील सर्व शाखामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप ढोरजे यांनी केला आहे. या गैरप्रकारामुळे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही ठेवीदारांनी आमरण उपोषणही केले होते. जिल्हाधिकारी यांनी या उपोषणाची कोणतीच दखल घेतली नसल्याची खंत ढोरजे यांनी व्यक्त केली.
ज्या ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असेल त्या ठेवीदारांनी बुधवारी (दि. 10) गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराजवळ जमा होण्याचे आवाहन घुले गुरूजी व धनंजय ढोरजे यांनी केले आहे.

नोट बंदीमुळे संस्थेस थोडी अडचण निर्माण झाली आहे. मात्र आत संस्थेचे व्यवहार सुरळीत होण्यास वेळ लागत आहे. ठेवीदारांच्या ठेवी आम्ही टप्पाने पुढील काही दिवसांत परत करण्याचा प्रयत्न करू.
– शैलेंद्र सुपेकर,
संचालक, महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी

LEAVE A REPLY

*