महाराष्‍ट्रपाठोपाठ मध्यप्रदेशातही शेतकऱ्यांचा उद्रेक!

0

मध्यप्रदेशातही शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .

सोमवारी मध्यप्रदेशातील शेतकरी हिंसक झाले.

मंदसौरमधील दलौदामध्ये काल (सोमवारी) रात्री 1000 हून जास्त आंदोलकांनी रेल्वे गेट तोडले.

त्याचप्रमाणे रेल्वे रुळही उखडून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. आंदोलकांना ताब्यात घेतले.

नीमच, रतलाम, धार आणि मंदसौरसह परिसरात शेतकर्‍यांचा उद्रेक सुरू होता.

संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रु धुराचा वापर केला.

रतलाम येथे झालेल्या दगडफेकीत एका पोलिस अधिकाऱ्याचा डोळा फुटला. सीहोर येथे संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन ठाणे अंमलदार आणि 11 पोलिस जमखी झाले.

ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळ करत आंदोलनाने हिंसक रुप धारण केले.

मात्र आंदोलन हिंसक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण चर्चेला तयार झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*