महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग भुसावळ अधिकारी व कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचार्‍यांचे वेतन व निवृत्तीवेतनाचे दायीत्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी  दि. ६ मार्च २०१७ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र प्राधिकरण संयुक्त संघर्ष समितीच्या राज्यव्यापी आंदोलनात येथील जीवन प्राधिकरण  उपविभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणारी शासनाची अंगीकृत संस्था आहे. सध्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्था पूर्वीच्या पाटबंधारे विभाग, नगरविकास विभागाच्या अख्त्यारित पाणीपुरवठा शाखा म्हणून कार्यरत होती. परंतु राज्यातील ग्रामीण व नागरी पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण कार्यक्रम जलद गतीने विकास व नियमन करण्याच्या अनुषंगाने अधिनियम १९७६ अन्वये महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिस्सारण मंडळ म्हणजेच आताचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापित करण्यात आले व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा खर्च त्यांना मिळणार्‍या १७.५ टक्के ई.टी.पी. मधून भागविण्यात येत होता.

तथापी घटनेच्या १२व्या व १३ व्या घटनेनंतर पाणीपुरवठा व्यवस्थापन व नियोजन कार्यान्वय स्थानिक संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत अतिशय कमी झाले आहेत. यामुळे  महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा अस्थापना खर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये  असंतोष पसरला असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पिण्याच्या पाण्याची मानवी मुलभूत गरज भागविण्यासाठी शासनाचे विविध कार्यक्रमांचे  नियोजन व नियमन करणारी शासनाची अंगिकृत संस्था सुरळीत चालावी व त्याचा  ङ्गायदा सर्वसामान्य जनतेस व्हावा या उदात्त हेतुने सध्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचार्‍यांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व शासनाने स्विकारावे या मागणीसाठी  महाराष्ट्र जीवन प्राधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यव्यापी  आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचार्‍यांची वरिल मागणी  शासनाने स्वीकारावी यासाठी आ.संजय सावकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  ङ्गडणवीस यांच्याकडे शिङ्गारस देखील केली आहे.

दि.७ मार्च रोजी या आंदोलनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग भुसावळचे  उपविभाग अधिकारी बी.सी.पाटील,  शाखा अभियंता एस.पी. लोखंडे, एच.एच. पठाण, वरिष्ठ लिपिक सौ.सी.तु. धांडे, कनिष्ठ लिपिक सी.व्ही. सोनार, एस.आर. महाजन,  गाडी चालक डि.एम. पाटील,  शिपाई ए.एस. सोनार,जलसेवक के.के. भारंबे,  बी.आर.जैन, यु.जी.सैयद, आर.आर.चौधरी, एस.बी. सुरवाडे व वाहन चालक एन.पी. सोनवणे यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

*