महाराष्ट्र कुस्ती प्रिमीअर लिगचा नोव्हेंबरमध्ये थरार

0

वैभव लांडगेंचा पुढाकार, पुणे, कोल्हापूर, नगरमध्ये रंगणार सामने ,पुणेे पॉवर आझमभाईंकडे

अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्हा तालीम संघ, अहमदनगर यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये प्रथमच महाराष्ट्र कुस्ती प्रिमिअर लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने हि स्पर्धा नोव्हेंबर 2017 मध्ये पुणे, कोल्हापुर आणि अहमदनगरमध्ये या कुस्तीचे सामने होणार आहेत. स्पर्धेचे मार्गदर्शक लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व पुणे जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे हे आहेत. महाराष्ट्र कुस्ती प्रिमिअर लीग स्पर्धेचे ब्रँड म्बेसिडर द ग्रेट खली व पै. योगेश्वर दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या संकल्पनेतून या व्यावसायिक कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहेत अशी माहिती पुणे पॉवर संघाचे मालक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आझम पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, नगरसेवक राहुल जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, ज्येष्ठ क्रिडापटू उमेश जोगळेकर, उद्योजक कार्तिक लांडगे, पै. हंगेश्वर धायगुडे, श्रीकांत हेबळे, सुनिल भिंगारे, पै. नामदेव लंगोटे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे कुस्तीप्रेम सर्वश्रुत असून त्यांनी महाराष्ट्र कुस्ती प्रिमिअर लीग मधील पुणेरी पॉवरफ या संघाचे मालकत्व स्विकारले आहे. याआधी अहमदनगर येथील बॉडीपॉवरचे अभिषेक भगत यांनी दख्खनचा काला चित्ताफ, प्रसिध्द उद्योगपती संजय किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडीचा योध्दाफ या संघाचे मालकत्व स्विकारल्याची माहिती पिंपरी चिंचवड येथे आज पुणेरी पॉवर या संघाच्या संघ वितरण सोहळ्यामध्ये बोलताना या स्पर्धेचे मुख्य आयेजक पै. वैभव लांडगे यांनी दिली.
कुस्तीची पंढरी समजल्या जाणा-या कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा व पात्रता फेरी होणार आहे. तसेच पिंपरीतील एच.ए.मैदान येथे पात्रता फे-या होऊन अहमदनगर येथील कै.पै.छबुराव लांडगे क्रीडा नगरी, वाडिया पार्क येथे उपांत्य सामने व अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधील एकूण 32 मल्ल खेळणार असून 16 राष्ट्रीय व 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश या स्पर्धेमध्ये असेल. प्रथम विजेत्या संघाला प्रसिध्द उद्योगपती सायरस पुनावाला यांच्यावतीने 21 लाख रुपये रोख व अर्धा किलो सोन्याची गदा देण्यात येणार आहे. व्दितीय विजेत्या संघाला 11 लाख रुपये रोख व पाच किलो चांदीची गदा तसेच तृतीय क्रमांक विजेत्या संघाला 7 लाख रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. पुरुष गटात 57, 65,74,86,97 आणि खुला गट 120 किलो वजनी गटात सामने होणार आहेत तर महिला गटात 48 आणि 58 किलो वजनी गटात सामने रंगणार आहेत. आठ खेळाडूंचा प्रत्येकी एक संघ असे एकूण आठ संघ लढणार आहेत. अशी माहिती पै. हंगेश्वर धायगुडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*