महाराष्ट्रभर गाजलेली एकांकिका माईक निघाली पुरूषोत्तम करंडक करायला….

0

पुरूषोत्तम करंडक 2014 चे विजेती हिय्या एकांकिकेचे लेखक संदिप पोपट दंडवते यांचीच माईक ही अनेक स्पर्धा गाजलेली एकांकीका पुन्हा पुरूषोत्तम करंडकात सहभाग नोंदवत आहे.

न्यु आर्टस कॉर्मस, सायन्स कॉलेज अ.नगर कडुन माईक ही एकांकिका सविनय सादर होणार आहे.

येत्या 12 ऑगस्टला भरत नाट्यमंदिर पुणे येथे संध्याकाळी 5 वाजता प्रयोग होणार आहे.

खुप धडपडीतुन या वर्षी पुरूषोत्तम करंडक करायला चान्स मिळाला आहे,आणि तेवढीच धडपडीतुन रंगीत तालिम करून न्यु आर्टस कॉलेज स्पर्धत ऊतरत आहे.

माईक एकांकिकेनं आत्तापर्यंत नगरचा अक्षर करंडक, बालिकाका करंडक, अहमदनगर महाकरंडक, सातार्याचा समर्थ करंडक, सांगलीचा करंडक,मुंबईचा कै.वसंतराव जाधव करंडक ,धुळ्याचा सुर्यकांता करंडक या स्पर्धत माईकनं अनेक पारितोषिकं मिळवली आहेत.

पुरूषोत्तम करंडक साठी मोलाचं मार्गदर्शन सिने-चित्रपट दिग्दर्शक आणि माईक एकांकिकेचे लेखक संदिप दंडवते याचं खुप मदत मानाच्या करंडक साठी वेळोवेळी होत आहे.या एकांकिकेतील कलाकार विराज अवचित्ते, कृष्णा वाळके, ऋषभ कोंडावार, निखिल शिंदे, संकेत जगदाळे, शुभम पोपळे, आकाश मुसळे, अभिषेक रकटे, अमित रेखी, हे सर्व आहेत.. आणि श्रेयस बल्लाळ हा एकांकिकेला संगीत देत आहे, तर अमोल साळवे एकांकिची प्रकाशयोजना करत आहे.

संदिप कदम, प्रिया तेलतुंबडे,रेणुका ठोकळ, हे यातील बॅकस्टेज कलाकार आहेत.

या एकांकिकेला कॉलेजचे मास कम्युनिकेशन डीपार्टमेंटचे शिक्षक प्रा.अनंत काळे सर, आणि प्राचार्य झावरे सर यांची मदत आणि सहकार्य ही एक मैलाचा दगड ठरत आहे…संदिप दंडवतेचं वेळोवेळी पुर्णवेळ असणारं सहकार्य हेही कॉलेजचं नाव नावारूपास येण्यात येत्या पुरूषोत्तम करंडक करण्यात ऊपयोगी ठरत आहे..

LEAVE A REPLY

*