महामुर्ख संमेलनात आ.राजुमामांना मुर्खशिरोमणी पदवी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  होळी निमीत्त उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामुर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात हास्य कविता व विनोदांनी रसिक श्रोते लोटपोट झाले होते. त्यानंतर आ. राजूमामा भोळे यांना संमेलनात मुर्खशिरोमणी पदवी प्रदान करण्यात आली.

एकता रिटेल पतसंस्था व साप्ताहिक सिटीन्युज यांच्या संयुक्त विद्यामाने कांताई सभागृहात उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामुर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपिठावर आ.राजूमामा भोळे, धनश्याम अडवाणी, युसुफ मकरा, ऍड.लक्ष्मण वाणी, गजानन मालपुरे, ललित बरडीया उपस्थित होते.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मुर्खांचे आराध्यदैवत मुर्खानंद गाढवजी यांच्या प्रतिमेस मेणबत्ती विझवून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांना चमचा, मिरची, गुटखा, सिगारेट इत्यादींचे हार घालून त्यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार, अरुण जेटली, राज ठाकरे, एकनाथराव खडसे, गिरीष महाजन यासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांवर  म्युझिकल फिशपॉंड सादर केले.

त्यानंतर ओमप्रकाश शर्मा यांनी बाईच बाईच्या जिवावर उठते हि विनोदी कविता तर संजय सारथी यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीचे शिर्षक असलेली विनोदी कविता सादर केली. यावेळी उपस्थितांमध्ये हस्याचे फवारे उडाले. सुत्रसंचलन विनोद त्रिपाठी यांनी केले.

मुर्खसंमेलनात यांना दिली पदवी

महामुर्ख संमेलनात आ.राजूमामा भोळे यांना मुर्खशिरोमणी, गनी मेमन यांना मुर्खानंद, युसुफ मकरा यांना मुर्खभूषण, घनश्याम अडवाणी यांना मुर्खप्रायोजक, गजानन मालपुरे यांना मुर्खाधिराज, ऍड. लक्ष्मण वाणी यांना मुर्खकुलदिपक तर ललित बरडीया यांना मुर्खनरेश ही पदवी प्रदान करण्यात आली.

फिशपॉंड मधून राजकीय नेत्यांवर विनोद

उत्तर महाराष्ट्र स्तरीय महामुर्ख संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार, अरुण जेटली, राज ठाकरे, एकनाथराव खडसे, गिरीष महाजन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, गुलाबराव देवकर, आ. चंदूलाल पटेल यासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांवर म्युझिकल फिशपॉंड सादर  करुन त्यांची खिल्ली उडविण्यात आली.

LEAVE A REPLY

*