महामार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढा!

0

धुळे /महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीलगत राष्ट्रीय महामार्गावर असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवावी.

याबाबत आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातजिल्हा उद्योग मित्र समितीची सभा झाली.

त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे बोलत होते. यावेळी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र काकुस्ते, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.आर.राठोड, व्यवस्थापक श्री.दंडगव्हाळ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता के.डी.पावरा, डी. व्ही. पाडळकर, उद्योजक नितीन बंग, मदन सुराणा, नितीन देवरे, संजय बागूल, भरत अग्रवाल, सुनील अग्रवाल, पी.एच. मचीये, पी.एम. पाटील, आर. सी.भंडारी, महेश नावरकर, राजेंद्र देसले, दिग्विजय तिवारी, प्रशांत मोराणकर, ए.एस. गुजराथी, एल.डी.पांढारकर, राहुल कुलकर्णी, सतीश सिंघवी, पी.आर.पालेकर यांच्यासह औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*