‘महाभारत’ चित्रपटाची टीम ७ जुलैला पंतप्रधानांची भेट घेणार

0

महाभारत या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.

किंबहुना चित्रीकरण सुरु झालेलं नसतानाही या चित्रपटाने अनेकांचं लक्ष वेधलंय. या चित्रपटाचं बजेट पाहता हासुद्धा कुतूहलचाच मुद्दा ठरतोय. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.

मोदींनी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त करत चित्रपट निर्माते बीआर शेट्टी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी या भव्य चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेविषयी आपणही उत्सुक असल्याचं मोदींनी या पत्रात म्हटलं आहे. इतकच नव्हे तर त्यांनी हा चित्रपट देशासाठी गर्वाची गोष्ट असल्याचंही म्हटलं आहे.

‘मातृभूमी’मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पंतप्रधानांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ‘महाभारत’ चित्रपटाच्या टीमने त्यांची व्यक्तिगतरित्या भेट घेण्याची आखणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जुलैला ही टीम पंतप्रधानांची भेट घेणार आहे.

LEAVE A REPLY

*