महापौर कार्यालयातील बजेट रजिस्टरला उपमहापौरांचा आक्षेप

0

बांधकाम विभागात ठेवण्याची मागणी विरोधकांच्या कामांना अडसर

अहमदनगर (प्रतिनिधी)- विकासभार, मागासवर्गीय कल्याणकारी निधी व रस्ते खोदाई फी च्या निधीतून करावयाची कामांचे रजिस्टर हे महापौर कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्याला उमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आक्षेप घेतला असून हे रजिस्टर शहर अभियंता कार्यालयात ठेवण्याची मागणी केली आहे. सेनेच्या महापौर सुरेखा कदम यांच्या विरोधात भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा संघर्ष कायम असल्याची पुष्टी यातून मिळाली.
महापालिकेच्या 2017-18 चे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. त्यातून विविध विकास कामे शहरात होणार आहेत. रेखांकन अंतर्गत सुधारणा, बांधकाम परवानगी अंतर्गत सुधारणा, प्रिमियम, रस्ते खोदाई फी, मागासवर्गीय कल्याणकारी निधी, विकासभार तसेच इतर लेखाशिर्षकांतर्गत निधी तरतूदी केल्या आहेत. या लेखाशिर्षकांतून करावयाची प्रभागातील कामे नगरसेवक सुचवित असतात. पण या लेखाशिर्षकांतून करावयाच्या कामांचे रजिस्टर हे महापौर कार्यालयात बेकायदा ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांना त्यांनी सुचविलेली कामे या रजिस्टरमध्ये खतविता येत नाहीत. त्यातून प्रभागातील विकास कामे करण्यात अडचणी निर्माण होत आहे. सत्ताधारी सेना ही त्यांच्याच पक्षातील, मर्जीतील नगरसेवकांची कामे या रजिस्टरमध्ये खतवितात. इतर पक्षातील नगरसेवकांना कामे खतविण्यात विरोध केला जातो. महापौर कार्यालयात ठेवलेली ही सगळी रजिस्टर शहर अभियंता कार्यालयात ठेवण्यात यावी अशी मागणी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*