महापौरपद सव्वा वर्षाचे? ; अनेकांना संधीसाठी भाजपाचा नवा फार्म्युला

0

नाशिक : महापालिकेत 66 जागा पटकावत एकहाती सत्ता घेणार्‍या भाजपकडून आता पाच वर्षात महापौर पदावर दोन जणांना संधी देण्याऐवजी सव्वा वर्षासाठी एकाला, अशी चार जणांना संधी देण्याचा नवीन फॉर्म्युला आणण्यात आल्याचे वृत्त आहे.

नाशिक महापालिकेतील महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षणामुळे भाजपातून महापौर पदासाठी सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या रंजना भानसी, दुसर्‍यांदा निवडून आलेले पुंडलिक खोडे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले सुरेश खेताडे, सरिता सोनवणे व रुपाली निकुळे यांच्या नावाची महापौर पदासाठी चर्चा सुरू आहे.

या पाच नावात रंजना भानसी यांच्या नावावर वरिष्ठ नेत्यात एकमत होण्याची शक्यता आहे. 66 जागा निवडून आणल्याने शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांचे राजकीय वजन वाढले असून वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घेतली आहे. महापौर पदासाठी शहराध्यक्ष आ. सानप यांच्याकडुन दुसरेच नाव वरिष्ठापर्यत नेण्यात आल्याची चर्चा आहे.

म्हणुन असाच प्रकार उपमहापौर पदाबाबत झाल्याचे सांगितले जात आहे. आपल्या मर्जीतील महापौर व्हावा अशी इच्छा नाशिक शहरातील आमदारांची असुन यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर व्यहरचना केली जात आहे. या एकुणच प्रकारामुळे आमदार व नगरसेवकांतील संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी आता पाच वर्षात सव्वा – सव्वा वर्ष महापौर पदावर चार जणांना संधी देण्याचा फॉर्म्युला भाजपाच्या काही नेत्यांनी समोर आल्याचे वृत्त आहे. हाच फॉर्म्युला उपमहापौर पदासाठी वापरला जाणार असल्याचे सांगण्यात येत आले.

अशाप्रकारे पाच वर्षात भाजपाकडुन हा फॉम्युला वापरला गेल्या 4 जणांना महापौर व 4 जणांना उपमहापौर पदावर संधी मिळणार आहे. यात पहिल्या अडीच वर्षात महापौर पद हे अनुसुचित जमातीसाठी आरक्षित असल्याने रंजना भानसी, सुरेश खेताडे, पुंडलिक खोडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी निघणार्‍या आरक्षणानुसार पुन्हा दोन जणांना महापौर पदासाठी संधी मिळणार आहे. उपमहापौर पदासाठी देखील अशाच प्रकारे 4 नगरसेवकांना संधी मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार महापौर पदी अनुभवी व्यक्ती बसविल्यास उपमहापौर पदी नवीन नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. या फॉर्म्युल्यातून सर्वांना संधी मिळेल आणि गटबाजी निर्माण होणार नाही, याकरिता हा फॉर्म्युला समोर आल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

*