महापालिकेला स्टॅम्प ड्युटी अधिभारापोटी मिळणार 12 कोटी

0

नाशिक : एलबीटीच्या माध्यमातून मालमत्ता खेरदी विक्रीतून लावण्यात आलेला 1 टक्का स्टॅम्प ड्युटी अधिभाराच्या माध्यमातून ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या 3 महिन्यांचे एकुण 12 कोटी 59 लाख रुपये नाशिक महानगरपालिकेला देण्याचे आदेश नुकतेच नगरविकास विभागाने दिले आहेत. यामुळे महापालिकेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या आक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2016 या काळात केंद्र सरकारने केलेल्या हजार व पाचशेच्या नोटाबंदीचा फटका सर्वांना बसला होता. यामुळेच राज्यातील महापालिकांना एलबीटीच्या माध्यमातून स्टॅम्प ड्युटीतून 1 टक्का कर वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. नाशिक महापालिका क्षेत्रात नोटाबंदीमुळे मालमत्ता खरेदी विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. यात मालमत्ता खरेदी व विक्री कमी झाली होती.

परिणामी कराच्या रुपातून शासनाकडुन मिळणार्‍या अनुदानात सुमारे अडीच ते तीन कोटींची घट होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अगोदरच 1 टक्का स्टॅम्प ड्युटीतून शासनाकडुन मिळणारी रक्कम गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेला मिळालेली नव्हती.

आता राज्य शासनाने ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या काळातील1 टक्का स्टॅम्प ड्युटीची रक्कम रुपये 12 कोटी 59 लाख रुपये नाशिक महपालिकेलादेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे. महापालिकेचे दायीत्वाचा आकडा वाढत असतांना आणि कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी ठेवी मोडण्याच्या हालचाली सुरू असतांनाच साडेबारा कोटींच्यावर रक्कम मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*