नाशिक महापालिका राबविणार कठोर प्लॅस्टिक बंदी

0

नाशिक | दि.२४ प्रतिनिधी- शहरातील सर्वच व्यावसायिकांना ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरास बंदी असतांना त्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचे गेल्या बुधवारी झालेल्या पाऊसाच्या निमित्ताने पाणी तुंबल्यानंतर समोर आल्याचा दावा महापालिकेने केले आहे. त्यामुळे आता बंदी असलेल्या पिशव्याचा वापर होऊ नये याकरिता प्रभावीपणे प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्यावर महापालिकेकडुन कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाने ८५ किलो प्लॅस्टिक पिशवी जप्त करीत अशा विक्रेत्यांकडुन ४२,५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे.
नाशिक विभागातील व्यवसायीक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मटण – मासे विक्रेते यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात बेकायदेशिरपणे प्लॅस्टिक पिशव्याचा वापर केला जात आहे. याचा प्रत्येक कचर्‍याचे ब्लॅकस्पॉट व रस्त्यांच्या कडेला दिसुन येत आहे. या प्लॅस्टिकच्या वाढत्या वापराचा त्रास आता शहराला होऊ लागला आहे. प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी कायदे असतांनाही याचा वापर केला जात असुन यात नागरिकांचा सहभाग असल्याचे अप्रत्यक्षरित्या दिसत आहे. नियमा प्रमाणे ५० मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पीशव्यांचा वापर व विक्री केल्यास प्रथम ५,००० रुपये दंड करण्यात येनार आहे. तसेच दुसर्र्‍यांदा विक्री करतांना आढळल्यास १०,००० रुपये दंड व तिसर्‍यादा आढळल्यास २५,००० रुपये दंड व तीन महिने कारावास अशी तरतूद आहे. असे असतांनाही शहरात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसुन येत असल्याने आता प्लॅस्टिक मुक्तीसाठी महापालिकेकडुन कठोर पाऊले उचलली जात आहे. यात महापालिकेने केलेल्या कारवाईत ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करीत ८५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहे. महापालिका आरोग्य विभागामार्फत प्लॅस्टिक जप्ती व प्रबोधन करण्याची मोहिम चालू आहे. नागरीक व व्यावसायिक यांनी या मोहीमेत दंडात्मक व कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणुन बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्याचा वापर न करता कापडी किंवा कागदी पिशव्याचा वापर करावा असे आवाहन महापालिकेकडुन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*