महापालिका गाळेधारकांकडुन वसुली मोहीम ; 38 लाखांची वसुली

0

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांमधील थकबाकीदार गाळेधारकांकडुन 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर 20 ते 25 मार्च या दरम्यान विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात तीन दिवसात सहा विभागातील गाळेधारकांकडुन 38 लाख 56 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार जाहीरात होर्डीग्ज ठेकेदारांकडुन 28 लाखांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रोहीदास बहिरम यांनी दिली.

महापालिकेची मालकीची सहा विभागात एकुण सुस्थितीत व चालु असलेले 1973 गाळे आहे. हे कार भाडे कराराच्या पोटी देण्यात आलेले असुन या सर्वच गाळ्याचा गेल्या वर्षी तात्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अचानक सर्व्हे केला होता.

यात अनेक गाळेधारकांचे करार संपलेले असुन कराराचा कालावधी सन 2004 व 2005 या दरम्यान संपलेला असतांना हे गाळे संबंधीतांकडेच आहे. तसेच अनेक जणांनी गाळे दुसर्‍यांना जास्त भाड्याने दिलेले असल्याचे सर्व्हेत दिसुन आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी या गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार भाडे आकारणीचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव करतांना हे गाळे आहे,

त्या व्यक्तींकडेच ठेवावेत असेही ठरविण्यात आले होते. या ठरावानंतर प्रशासनाने ठरावानंतर संबंधीत गाळेधारकांना 50 टक्के रेडीरेकनर दराने भाडे आकारणी करण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र ठरावापुर्वीचे आणि नवीन ठरावानुसार भाड्याची थकबाकी भरली जात नव्हती.

त्यामुळे प्रशासनाने आता थकबाकीदार गाळेधारकांविरुध्द थकबाकी वसुली सुरु केली आहे. 20 ते 25 मार्च या दरम्यान सुरू असलेल्या थकबाकी वसुलीत तीन दिवसात नाशिक पुर्व मधुन 7 लाख 27,000 रु., नाशिक पश्चिम मधुन 20 लाख 51,000 रु. व 10 लाख 78,123 रु. अशी वसुली केली. 31 मार्चपर्यत भाडे थकबाकी न भरल्यास गाळे जप्तीची कारवाई करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

LEAVE A REPLY

*