Type to search

जळगाव

महात्मा, सेंट्रल फुले मार्केटमधील 4 गाळे सील

Share

जळगाव । शहरातील सेंट्रल फुले व महात्मा फुले मार्केटमधील मुतारी शौचालयाकरिता करण्यात आलेल्या गाळ्यांच्या वापर व्यावसायिक म्हणून वापर होत असल्याने अशा 4 गाळ्यांना आयुक्त, उपायुक्त महसूल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरवार दि.18 रोजी 11.30 वा. तात्काळ सील करण्यात आले. अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान, कार्यालयीन कर अधीक्षक नरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

येथील सेंट्रल फुले, महात्मा फुले येथील दोन दोन गाळे हे मुतारीसाठी तयार करण्यात आले होते. मात्र या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या जागेची पाहणी केली असता संबंधित शौचालय, मुतारीसाठी असलेल्या गाळ्यांचा कमर्शियल वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे गाळे ताब्यात घेण्यात आले व अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान, कार्यालयीन कर अधीक्षक नरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ठराव विखंडित
तत्कालीन न.पा. ठराव क्र. 362 दि. 23 सप्टेंबर 2000, स्थायी ठराव क्र. 150, दि. 29 जुलै 2005, तत्कालीन न.पा. अध्यक्ष यांचे आदेश यांचे आदेश क्र. 1151 दि. 15 जुलै 95 या अन्वये हा ठराव विखंडित करण्यात आले होता. त्यामुळे आता त्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. गाळे ताब्यात घेतांना प्रथम मनपाकडील वायरमन यांच्या मदतीने बंद गाळ्यांमध्ये काही शॉटसर्किट होवू नये म्हणून प्रथम वीज कनेक्शन कट करण्यात आले.

कारवाईचे स्वागत
गेल्या 20 वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आज मनपा प्रशासनाला मार्गी लावण्यास यश मिळाले. या कारवाईची अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती. मात्र या दृष्टीने हालचाली होत नव्हत्या. अखेर आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी कणखर भूमिका घेत ही कारवाई राबविण्यात आली. उपायुक्त महसूल यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले व हा प्रश्न तडीस लागला. या कारवाईमुळे जनसामान्यांकडून स्वागत केले जात आहे.

संबंधित मुतारी, शौचालांसाठीचे असणारे गाळे हे मुतारींसाठी न ठेवता व्यावसायिक वापर म्हणून अनाधिकृतपणे वापरले जात होते. यासंबंधी स्थायीत व मनपात दोन वेळा ठराव विखंडीत करण्यात आला होता. त्यामुळे या गाळ्यांवर कारवाई करणे क्रमप्राप्त होते. ऑर्डरनुसार आज ही कारवाई आयुक्त, उपायुक्त महसूल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
– नरेंद्र चौधरी, कार्य. कर अधीक्षक

अनधिकृतपणे गाळे बळकावणार्‍यांची चौकशी करा, त्यांना शोधून योग्य ती कारवाई करा असे आदेश उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच नागरिकांना मुतारी, शौचालये या जागेवर तात्काळ बांधण्यात येतील, त्यासंबंधी आपण आयुक्तांकडे पाठपुरावा करु
-डॉ.अश्विन सोनवणे, उपमहापौर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!