महागडे मोबाइल फोन बनवणारी ‘Vertu’ कंपनी बंद होणार?

0

डा मोबाइल फोन बनवणारी कंपनी Vertu लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

जगातील सर्वात महागडे मोबाइल फोन बनवणारी कंपनी Vertu सध्या आर्थिक पातळीवर अडचणीत आहे.

Vertuच्या फोनची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. पण या फोनवर यूजर्सला प्रीमियम स्मार्टफोनपेक्षाही कमी फीचर्स मिळतात.

Vertu या फोनची खासियत म्हणजे या फोनसाठी अगदी महागडं साहित्य वापरलं जात. यामध्ये महागडं चामडं आणि महागड्या रत्नांचा वापर केला जातो.

टेक एक्सपर्टच्या मते, चांगले फीचर्स किंवा यूजर्सला आकर्षित करणारे फोन Vertu बाजारात आणू शकली नाही. त्याऐवजी दुसऱ्या कंपन्या आपल्या स्मार्टफोन यूजर्सला Vertu पेक्षा अधिक चांगले फीचर्स देतात

बीबीसीसोबत बोलताना या कंपनीचे माजी प्रवक्ते म्हणाले की, ‘कंपनी बंद होण्याच्या प्रक्रियेत आहे. सध्या मी या कंपनीत नाही. माझा पगार बंद झालेला आहे.’

Vertu कंपनी ही 1998 साली नोकियानं सुरु केली होती. ऑक्टोबर 2012 मध्ये नोकियानं ही कंपनी विकली होती. त्यानंतर Vertuच्या फोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाऊ लागली.

LEAVE A REPLY

*