महसूलची चावडी वाचन मोहिम थंडबस्त्यात!

0

1 हजार 332 गावांना प्रतिक्षा, 15 जूनची डेडलाईन । 1 ऑगस्टपासून डिजीटल सातबारा मिळणार!

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – 1 ऑगस्टपासून खातेदारांना संगणकीकृत सातबारा मिळणार आहे. त्यापार्श्‍वभुमिवर चावडी वाचन मोहिमेव्दारे सातबार्‍याचे शुध्दीकरण करण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप 1 हजार 332 महसुली गावांतील खातेदारांना चावडी वाचन कार्यक्रमाची प्रतिक्षा आहे.1 पासून सुरु झालेली मोहिम 15 जून पर्यत पूर्ण होणार का? शासनाच्या निदेॅशाप्रमाणे 1 ऑगस्टपासून डिजीटल स्वाक्षरीत संगणकीकृत सातबारा उतारा मिळणार का? असा प्रश्‍न खातेदारांना पडला आहे.

 
जिल्ह्यातील अनेक खातेदारांच्या सातबार्‍यावर चूका असल्यास संबधित तलाठी कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त .दरम्यान चावडी वाचनाच्या माध्यमातून चूका दुरुस्त करण्याची संधी खातेदारांना मिळणार असल्याने गावो-गावी अनेकांच्या नजरा महसुलच्या चावडी वाचनाकडे आहे.मात्र, अद्याप सदर मोहिमेला अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याचे दिसून येत आहे. डिजीटल इंडीया लँड रेकॉर्ड मॉर्डर्नायझेशन कार्यक्रमातर्ंगत 7/12 संगणकीकरणाची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी संगणकीकृत व हस्ताक्षर लिखित सातबार्‍यावरील नोंदी बरोबर असल्याची खात्री संबधित तलाठी भाऊसाहेबांनी करणे बंधनकारक आहे. महारा्र जमिन महसुल अधिकार अभिलेख व नोंदवह्या नियम 1971 चे नियम 6 व 7 प्रमाणे चावडी वाचन मोहिम राबविण्यात येत आहे.

 

खातेदारांना आपल्या सातबारा उतार्‍यावर त्रुटी आढळून आल्यास संबधित कार्यालयाकडे हरकती नोंदवता येणार आहे. 15 मे ते 15 जून दरम्यान गावनिहाय चावडीवाचन कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.

 

त्यासाठी गावातील सार्वजनिक ङ्गलकावर त्यासंबधी माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. चावडीत संगणकीकृत सातबारा अवलोकनासाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.दरम्यान त्रुटी आढळुन आल्यास सातबार्‍यावर हिरव्या शाईने दुरुस्त करुन आक्षेपासह 7/12 ची तलाठी यांच्याकडून दुरुस्त करण्यात येणार आहे.मात्र, संबधित गावात चावडी वाचन मोहिम न राबविल्यास शासनाचा उद्देश सार्थ ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

10 दिवसात 240 गावांत चावडीवाचन
जिल्ह्यातील एकूण 1 हजार 602 महसुली गावापैकी 25 मे अखेर केवळ 240 गावामध्ये चावडी वाचन मोहिम राबविण्यात आल्याचा महसूल विभागाचा अहवाल आहे. यामध्ये संगमनेर, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील सर्वाधिक गावे आहेत.तालुकानिहाय संख्या-नगर-41, नेवासा-10, संगमनेर-49, अकोले- 5, श्रीगोंदा-43, पाथर्डी-2, शेवगांव व कोपरगाव प्रत्येकी -8, जामखेड-6, कर्जत-19, राहुरी-30, राहाता-19 आदी संख्या आहे.

 

चावडीच्या प्रतिक्षेतील गावांची संख्या
नगर- 78, नेवासा-117, संगमनेर-123, अकोले-186, पारनेर-131, श्रीगोंदा-72, पाथर्डी-135, शेवगाव-105, जामखेड-81, कर्जत-99, श्रीरामपूर-56, राहुरी-66, राहाता-42 व कोपरगाव-71 आदी गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम बाकी आहे.

LEAVE A REPLY

*