मविप्र निवडणुकीसाठी 2 दिवसात 256 उमेदवारी अर्ज

0

नाशिक । दि.22 प्रतिनिधी – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दुसर्‍या दिवशी 128 अर्जाचे वितरण झाले असुन गेल्या दोन दिवसात 256 उमेदवारी अर्ज झाले आहे. उद्या (दि.23) पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असले तरी अर्ज वितरण मात्र दि.27 जुलैपर्यत चालणार आहे.

या प्रक्रियेबरोबरच आता सत्ताधारी व विरोधक यांच्या मतदारांसोबत गुप्त बैठकांना वेग देण्यात आला असुन उमेदवारी देतांना पाठींब्याचा आकडा लक्षात घेतला जाणार आहे. मात्र पॅनलची उमेदवारी ही 3 ऑगस्ट या माघारीच्या दिवशीच करण्याची तयारी करण्यात आल्याने इच्छुकांची मोठी गोची झाली आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदाचा निवडणुक मोठी चुरशीची होणार असल्याची चर्चा असुन सत्ताधारी व विरोधकांच्या गुप्त बैठकांना वेग आला आहे. यात निवडणुक मंडळाकडुन सुरू झालेल्या प्रकियेत अर्ज वितरणात 21 जुलैला 127 व आज 129 असे एकुण 256 अर्जांचे वितरण झाले आहे. उमेदवारी अर्ज हा संचालक व पदाधिकारी यांच्यासाठी वापरला जाणार असल्याने तुर्त कोणी कोणत्या जागेसाठी अर्ज नेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अर्ज घेऊन जाणार्‍यात दिलीप डेर्ले (सेवक), विलास बच्छाव, माधवराव तासकर, भगवान बोराडे, कोंडाजी गोवर्धने, साहेबराव पाटील, मिराबाई चोळके, सुनिल देवरे, नरेंद्र आहिरे, किरण रौंदळ, विजय पवार, प्रताप मोरे, सयाजी पाटील (सेवक), राजीव पाळेकर (सेवक), डॉ. अशोक बच्छाव, अ‍ॅड. भास्करराव पवार, डॉ. जयंत पवार, डॉ. अशोक पिंगळे, डॉ. भरत गारे, केशव सिरसाठ (सेवक), राजेंद्र नवले, श्रीमती कुमूदिनी पागेरे, प्रविण तिदमे, बाळकृष्ण हांडोरे, वसंत मुसळे, दिलीप मोरे, प्रकाश कवडे, प्रल्हाद सोनवणे, नामदेव महाले, निलीमा आहेर, भाऊसाहेब गडाख, विकास कवडे, भास्कर गिते, संपतराव गावले, अ‍ॅड. बी. एन. गव्हाणे, डॉ. तुषार शेवाळे, शिवाजी बस्ते, काशिनाथ पवार, प्रभाकर पाटील, नानाजी दळवी, सचिन पिंगळे, पंढरीनात्र पाचोरकर, अ‍ॅड. शशिकांत गायकवाड, नारायण हिरे आदीसह इतर सभासदांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज वितरणाची प्रक्रिया येत्या 27 जुलैपर्यत चालणार असुन उद्यापासुन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

त्यामुळे उद्यापासुन अर्ज वितरण आणि अर्ज स्विकृतीचे काम दोन खिडकीस सुरू होणार असल्याची माहिती निवडणुक मंडळाने दिली. उद्यापासुन दाखल होणार्‍या अर्जाची माहिती मध्यवर्ती कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्द केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*