मल्लखांबपटूंना प्रशिक्षकांनी प्रोत्साहीत करावे !

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे दि.15 जून हा दिवस मल्लखांब दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी जिल्हयामधील मल्लखांब पटूंकडून एक कक्ष साधी उडीचे लक्ष्य पुरलेल्या टांगला व दोरीच्या मल्लखांबावर पूर्ण करण्याचा संकल्प राज्य मल्लखांब संघटनेने सोडला आहे.
त्याच्या पुर्तीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, व्यायाम शाळा, महाविद्यालयातील मल्लखांब पटुंना आपल्या प्रशिक्षीत प्रशिक्षकांच्या मदतीने जास्ती जास्त साध्या उडया करण्यास प्रोत्साहीत करावे असे नंदुरबार जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी सांगितले.
मल्लखांब हा प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र त्याचे उगमस्थान आहे. तसेच तो इतरत्र वाढलेला व्यायाम प्रकार आहे.
मल्लखांबाचा उल्लेख प्राचीन काळी 1135 मध्ये सोमेश्वर चालुक्याने लिहिलेल्या मानसोल्हास या ग्रंथात आढळतो. श्री कृष्णाच्या काळातही मल्लखांब सारखे व्यायामाचे उपकरण असल्याचा उल्लेख कथा पुराणात सापडतो.
दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या दरबारात पैलवान म्हणून ख्याती असलेले नाशिकचे गुरूवर्य बालभट देवधर यांना मल्लखांबाचे आदरजनक मानले जाते.

19 व्या शतकाच्या ुसरूवातीची ही गोष्ट आहे. दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचया काळातही मराठी राज्य पातीपतच्या दारूण पराभवातून सावरू पाहत होते. भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा प्रयत्न करत होते.

राजकीय व सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कल फाटाफुटीचे राजकारणयामध्ये मराठी दरबारापुढे एक आव्हान येवून ठेपले ते हैदराबादचया निजामाकडून विविध राज्यामधून विजय मिळवत आलेल्या आली व गुलाब या दोन कसलेल्या भिमकाय व बलदंड पैवालनानी दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या भरदरबारात कुस्तीचे आव्हान दिले.

पैलवांनाचा आत्मविश्वास पदरी असलेल्या बावन्न पैवालनांपैकी एकाचीही आव्हान स्विकारण्याची हिमंत झाली नाही. पेशव्यांची इभ्रत पणाला लागल्याचे पाहून पेशव्याकडे भिक्षुकी करणार्‍या 17 ते 18 वर्षा बालंभटदादा देवधर यांनी ते आवाहन स्विकारले व तयारीसाठी काही मुदत मागून घेतली.

बालभट्टदादा देवधर यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जावून मातेचे आशिर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तश्रृंगी देवीची आराधना सुरू केली.

असे म्हणतात की, त्यांच्या कठोर अनुष्ठानाने देवी प्रसन्न झाली आणि तिने बालभट्टादारांना आशिर्वाद दिला की, प्रत्यक्ष मारूतीराय त्यांना कुस्तीचे डाव शिकविले त्याप्रमाणे बजरंग बलीने दृष्टांस देवून एका लाकडी खांबावर कुस्तीचे डाव दाखवले बाळभट्टदादा ठरलेल्या मुदतीत पुण्याला परतले आणि स्वतःपेक्षा वयाने अनुभवाने वजनाने मातब्बर असलेल्या लीला गळखोडाच्या डावांनी चीतपट केले.

गुलाब बाळभटदादाची तयारी पाहून अक्षरशः पळून गेला ही ऐतिहासीक कुस्ती झाली तो बहुदा जून महिनाच असावा. पेशव्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना बालभटदारानी या यशामागील रहस्य सांगितले.

त्याच वेळेस मल्लखांब विद्याही लोकार्पण झाली व समस्त मानव जातीला निरोगी राहण्याची गुरूकिल्ली मिळाली. या दिवसाची आठवण करून या मानव समाजाला सशक्त बनविण्यार्‍या मल्लखांबाचा दिसस साजरा करून सशक्त भारत बनविण्याच्या कामात आपला खारीचा वाटा उलचून या आणि यासाठी कमीत कमी वेळात शरीराच्या जास्ती जास्त भागांना सर्वाधिक व्यायाम देणार्‍या जगातील एकमेव क्रिडा, व्यायाम प्रकाराबद्दल अधिकाधिक जागृती करण्यासाठी दि.15 जून हा दिवस मल्लखांब दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*