‘मला वाटते जान्हवीने लग्न करून संसार थाटायला हवा’ : श्रीदेवी

0
श्रीदेवीने मुलगी जान्हवीच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. नुकतेच एका मुलाखतीत श्रीदेवी म्हणाली, जान्हवीला चित्रपटांत काम करायचे आहे. पण मला असे वाटते की, तिने लग्न करून संसार करायला हवा. एका आघाडीच्या दैनिकाशी बोलताना श्रीदेवी म्हणाली, जान्हवीला ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ मध्ये काम करायचे आहे, पण मला तसे वाटत नाही.
श्रीदेवीच्या मते चित्रपटसृष्टी वाईट आहे, असे मी म्हणत नाही. कारण मीही त्याचा एक भाग आहे. पण पालक असल्यामुळे जर जान्हवीने लग्न केले तर मला अधिक आनंद होईल.
– मात्र जान्हवीचा आनंदही माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तिला अॅक्ट्रेस बनायची इच्छा असेल तरी मला तिचा अभिमान आहे.
श्रीदेवी म्हणाली, नुकतीच मी मुलींबरोबर (जान्हवी आणि खुशी) बरोबर एका कार्यक्रमात गेले होते. पण लोकांना असे वाटते की मी मुलांना प्रमोट करण्यासाठी मुलसींबरोबर जाते. पण आई असल्यामुळे माझ्या मुली माझ्याबरोबर असतील तेव्हा मला अभिमान असतो. लोक मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढतात.

LEAVE A REPLY

*