‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ : स्पृहा-गश्मीर

0

आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात खरंच काही प्रॉब्लेम नाही की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लपवण्यासाठीचा हा अट्टहास? या कोड्यात अडकलेल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आला आहे गश्मीर – स्पृहाच्या नव्या चित्रपटाचं नवं कोरं टीझर पोस्टर…

‘फिल्मी किडा निर्मित’ या चित्रपटाच्या पोस्टरवर मला काहीच प्रॉब्लेम नाही असा आव ही जोडी आणते आहे… पण हे म्हणण्याइतपत असा कोणता प्रॉब्लेम या जोडीच्या आयुष्यात आला आहे, हे अद्याप कळलेलं नाही. या चित्रपटासाठी गश्मीर – स्पृहा या आगळ्यावेगळ्या जोडीने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.

वायझेड, डबल सीट यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या समीर विद्वंस याने या युगाचा ‘प्रॉब्लेम’ दिग्दर्शित केला आहे. पी. एस छतवाल, रीचा सिन्हा आणि रवी सिंह यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे

LEAVE A REPLY

*