मर्सिडीझ बेंझच्या नव्या ‘E-220’ला ‘वर्ल्ड लक्झरी कार ऑफ द इयर’ पुरस्कार

0
मर्सिडीझ बेंझच्या नव्या ई क्लास कारला ‘वर्ल्ड लक्झरी कार ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
आता कंपनीने या कारला ऑल अॅल्युमिनियम (अॅल्युमिनियम इंजिन ब्लॉक आणि स्टील पिस्टन) फॉर सिलिंडर डिझेल इंजिनसह सादर केले आहे. बेंझचे हे आत्तापर्यंतचे सर्वात अद्ययावत तंत्राचे डिझेल इंजिन मॉडेल आहे.
भारतात बेंझने पूर्वी ई २०० पेट्रोल आणि ई ३०० डिझेल कार सादर केली होती. ई २०० पेट्रोल आणि ई ३०० डिझेलच्या किमतीमध्ये बरीच तफावत होती. पेट्रोल कार खरेदी केली असती तर ५६. १५ लाख रुपयांत उपलब्ध होती आणि डिझेल कारची किंमत ६९.४७ लाख रुपये होती.
दोन्ही कारमध्ये १२ लाखांचा फरक होता. हा फरक कमी करण्यासाठी बेंझने ई २२० डिझेल कार सादर केली. या कारची किंमत ५७.७ लाख रुपये आहे. डिझेल कार खरेदी करण्यासाठी पेट्रोल कारच्या किमतीपेक्षा १ लाख रुपये अधिक द्यावे लागतील. यात वापरलेले इंजिन १३% डिझेल कमी वापरते आणि जुन्या इंजिनपेक्षा १७% हलके आहे.
ऑल अॅल्युमिनियम इंजिन असल्यानेे वजनाने हलके असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिझेल इंजिन असूनही हे खूप कमी आवाज करते.

LEAVE A REPLY

*