Type to search

धुळे

मर्चंट बँक अवसायकाच्या कार्यालयाला ठोकले सील

Share

धुळे | येथील मर्चंट बँकेच्या अवसायकाच्या कार्यालयाला स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेच्या पथकाने सील ठोकले.

मर्चंट बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार एका सभासदाने केली होती. त्यादृष्टीने तपास करण्यात येवून तपासादरम्यान बँकेचे अवसायक उपनिबंधक ठाकूर यांनी लाभापोठी सभासद हिताचे नुकसान केल्याचे तपासात समोर आल्यामुळे त्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने अटक केली. श्री. ठाकूर हे सध्या पोलिस कोठडीत आहेत.

बँकेचे अवसायकांचे कार्यालय गरुड कॉम्प्लेक्स मधील शॉप नं. एल २७ येथे आहे. आज स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेच्या पथकाने कार्यालयाची झाडाझडती घेतली. तसेच कार्यालयातील कागदपत्रे सुरक्षित रहावे म्हणून तेथील कपाटांसह कार्यालयाला सील ठोकण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!